Soybean Rate | सिन्नरमध्ये आधारभूत किमतीत सोयाबीनची खरेदी सुरू; काय मिळाला दर? वाचा सविस्तर


Soybean Rate | सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर पासून सिन्नर तालुका खरेदी-विक्री केंद्रात सोयाबीनचे आधारभूत किमतीत खरेदी सुरू झाले असून क्विंटलला 4,892 रुपये दर मिळत आहे. गेल्यावर्षी शासनाकडून क्विंटनला 4,600 रुपयांचा भाव मिळाला होता. यावर्षी या 292 रुपयांनी वाढ झाली असून यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावे. असे आवाहन संस्थेचे चेअरमन नितीन आव्हाड व व्यवस्थापक दत्तात्रय राजेभोसले यांच्याकडून करण्यात आले आहे.

Agro News | ऐन दिवाळसणात भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादकांना फटका; द्यावी लागतेय दुप्पट मजुरी

सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ

तर यंदा सोयाबीनची लागवड जास्त प्रमाणात झाली असून चांगला पाऊस पडल्याने सोयाबीनचा उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र बाजारपेठेत 4,100 ते 4,300 रुपये दराने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी केले जात आहे. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या सोयाबीनच्या आधारभूत किमतीत खरेदी होण्यासाठी राज्यपालन मंडळाकडून सिन्नर तालुका खरेदी-विक्री संघाला अधिकृत खरेदी अभिकर्ता म्हणून मान्यता मिळाली आहे.

Agro News | हमीभावापेक्षा 500 ते 700 रुपयांनी कमी भाव मिळत असल्यामुळे सोयाबीन उत्पादकांमध्ये नाराजी

ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन

याकरिता शेतकऱ्यांना स्वतःचे आधार कार्ड, सोयाबीन पिकाचा पीक फेरा नोंद उतारा, मोबाईल नंबर, सोयाबीनची नोंदणी असलेल्या जमिनीचा सातबारा खाते उतारे, चार पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्रे लागणार असून खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात 11 ते 5 या वेळेत घेऊन येत ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे. शासनाने सोयाबीनसाठी 4,892 रुपये क्विंटल ही किमान आधारभूत किंमत जाहीर केली आहे. परंतु व्यापारी मात्र शेतकऱ्यांची फसवणूक करत असून शेतकऱ्यांकडून 4,200 या किंमतींत सोयाबीन खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना खरेदी-विक्री संघाकडे सोयाबीन विक्री करण्याचे आवाहन. (Soybean Rate)