Weather Forecast | राज्यामध्ये सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत असून सकाळी व रात्री थंडी तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका बसत आहे. तर काही भागात अजूनही पाऊस कायम आहे. दिवाळीत राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती, विशेष म्हणजे कोकणात अजूनही पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईत तापमानाचा पारा चढताना दिसत आहे.
Weather News | पावसाने उघडीप देताच राज्यात थंडीची चाहूल
प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालावली
आय. एम. डीच्या अहवालानुसार, राज्यात आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी कोरडे हवामान राहणार असून मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे झालेल्या धुरामुळे हवेची गुणवत्ता खराब झाली आहे. याचा परिणाम हवामानावर झाला असून राज्यात म्हणावी तशी थंडीला अजूनही सुरुवात झाली नाही. काही जिल्ह्यांमध्ये तापमान वाढले असल्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत.
हळूहळू थंडीत वाढ होणार
मुंबई, ठाणे व उपनगरात सध्या उष्ण व दमट वातावरण असल्यामुळे उकाड्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तर विदर्भ, मराठवाड्यात देखील तापमानात वाढ झाली असून सकाळी आणि रात्री हलका गारवा जाणवत आहे. उद्यापासून तापमानात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. तर राज्यात अजूनही थंडीची चाहूल लागलेली नसून येत्या काही दिवसानंतर हळूहळू थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येथे काही दिवसांत तापमानात काही अंशाने घट होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात देखील ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवत असल्यामुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून ढगाळ वातावरणातहीत तापमान वाढले आहे.
Weather Forecast | ऐन दिवाळीत पावसाचा अंदाज; राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा
आज ‘या’ भागात पावसाची शक्यता
कोकणात पावसाची शक्यता असून हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा येलो अर्लट देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत काही तुरळक ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाच्या, वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरींची शक्यता आहे. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Weather Forecast)