Weather News | राज्यावरील वादळी पावसाचे सावट दूर झाल्यामुळे उघडीप मिळण्याची चिन्हे आहेत. आज दि. 24 ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळ ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहणार असून कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Weather Forecast | अखेर परतीच्या पावसापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार!
राज्यात पारा 35 अंशाच्या खाली
पावसाळी व ढगाळ हवामानामुळे ऑक्टोबर हिटचा कडाका काहीसा कमी झाल्याने कमाल तापमानात घट झाली असून पारा 35 अंशाच्या खाली घसरला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 35 पूर्णांक 6 अंश तापमानाची नोंद झाली. तसेच वाशिम आणि सांताक्रुज येथे 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्याच्या किमान तापमानात घट
पावसाची उघडीप मिळताच राज्याच्या उत्तर भागात रात्रीच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भागात असलेल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीसह कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Weather News | मॉन्सून परतला तरी पाऊस कायम; हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा इशारा
आज ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता:
आज राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. (Weather News)