Weather News | मॉन्सून परतला तरी पाऊस कायम; हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा इशारा


Weather News | नैऋत्य मोसमी वारे राज्यातून परतले असले, तरीही पाऊस कायम आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत असून अजून किती दिवस पाऊस पडणार? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात काहीसा दिलासा मिळणार असून हवामान कोरडे राहणार आहे. तर बंगालच्या उपसागरात 23 ऑक्टोबरनंतर “दाना” चक्रीवादळाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Weather Update | राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार

काही काळ पाऊस कायम राहणार

सध्या नैऋत्य मोसमी वारे आणि अरबी समुद्राकडून येणारे बाष्प या दोन्ही वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पाऊस पडत असून हवामानाचे प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची तसेच 22 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 23 ऑक्टोबरपर्यंत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होऊन त्यानंतर ते उत्तर-पश्चिम दिशेने सरकून 24 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ओडिसा पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची दाट शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सून परतला असला तरी बाष्प असल्यामुळे काही काळ पाऊस सुरूच राहतो. तर तापमानातही वाढ दिसून येते. यामुळे ढगांची निर्मिती होऊन कमी वेळेत जास्त पाऊस पडतो. हिच स्थिती सध्या राज्यामध्ये निर्माण होत असून काही दिवस अशीच परिस्थिती असणार आहे. त्यानंतर मात्र हवामान कोरडे राहणार असल्याचे हवामान विभागाचा अंदाज आहे.

‘दाना’ चक्रीवादळ धडकणार

24 ते 25 ऑक्टोबरला बंगालच्या उपसागरात ओडिसा किनारपट्टीवर ‘दाना’ चक्रीवादळ तयार होणार असून त्याच्या प्रभावामुळे 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान ओडिशा व पश्चिम बंगालच्या किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Weather News | राज्यात पावसाचा इशारा कायम; तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता

आज ‘या’ भागात पावसाची शक्यता

तर प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबर रोजी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे. तर लातूर, धाराशिव, जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरांचा अंदाज आहे. (Weather News)