Agro News | सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात परतीच्या पावसाने द्राक्ष बागायतदारांचे अतोनात नुकसान केले आहे. तालुक्यातील सुमारे 5 हजार हेक्टर द्राक्ष क्षेत्र पावसामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे आता हंगामा या जाण्याची चिंता शेतकऱ्यांना लागले असून शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांमध्ये पाणी साचल्याने हंगामातील भागांची छाटणी खोळंबली आहे. तसेच आगाप केलेल्या भागांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे.
देशासह परदेशातही पलूसच्या द्राक्षाला मागणी
पलूसच्या शेतकऱ्यांनी देशासह परदेशात द्राक्षांचा दर्जा उंचावला, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेत पलूसच्या द्राक्षला चांगली मागणी होती. परंतु याच द्राक्ष शेतीला गेल्या 5 महिन्यांपासून, मुसळधार पावसामुळे ग्रहण लागले आहे. आज दि. 21 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्यामुळे द्राक्ष बागांची 50% पेक्षा अधिक छाटणी लांबणीवर पडली आहे. तर या पावसामुळे छाटणी केलेल्या द्राक्ष बागांवर फळपोज दावण्या, करपा रोगाचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे.
पानगळतेमुळे झाडांना द्राक्ष येतील ही आशा मावळली
तर सप्टेंबर अखेरीस होणारी फळ छाटणी लांबणीवर गेली असून गेल्या 8 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे बागांची पानगळ झाली आहे. द्राक्ष बागेत ट्रॅक्टरद्वारे औषध फवारणी करताना पाण्यातून काम करताना मजुरांना अडथळा येत आहे. पावसामुळे चिखल झाल्यामुळे मजूर मिळणे देखील अवघड झाले असून ज्या शेतकऱ्यांनी अगं छाटणी केली आहे. त्या भागांच्या पानगळतीमुळे यावर्षी झाडांना द्राक्ष येतील ही आशा आता मावळत चालली आहे. शेतकऱ्यांचे द्राक्ष बागेसाठी खर्च केलेले पैसे वाया जाण्याची चिन्हे असून द्राक्ष बागायतदारांना एकेरी 5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.
Agro News | राज्यसरकारकडून 84 साखर कारखान्यांना 14 कोटींचे व्याज अनुदान मंजूर
5 लाख रुपयांच्या मदतीची मागणी
जिल्हाधिकारी यांनी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, तसेच द्राक्ष बागायतदारांना सरसकट 5 लाख रुपयांची मदत जाहीर करावी. अन्यथा आगामी विधानसभेच्या मतदानावर द्राक्ष उत्पादक शेतकरी बहिष्कार टाकतील. असा इशारा रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक लाड यांनी दिला आहे. (Agro News)