Weather News | राज्यात पावसाचा इशारा कायम; तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता


Weather News | राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस कायम आहे. तर पावसाची उघडीप असलेल्या भागांमध्ये उन्हाचा चटका जाणवत असून उकाड्यात वाढ झाली आहे. विदर्भात ऑक्टोबर हिट अनुभवायला मिळत आहे. आज दि. 19 ऑक्टोबर रोजी राज्यात वादळी वारे आणि विजांसह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असल्याकारणाने हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उन्हाचा चटका तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Weather News | पश्चिम महाराष्ट्र व कोकण पट्ट्यात सर्वाधिक पावसाची नोंद

ब्रह्मपुरी येथे शुक्रवार दि. 18 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत 24 तासांमध्ये राज्यातील उच्चांकी 37.3 अंश तापमानाची नोंद झाली तर चंद्रपूर, अकोला, अमरावती येथे 35° पेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. विदर्भासह राज्यात उन्हाचा उकाडा वाढला असून अनेक ठिकाणी तापमान 33 अंशा पार गेले होते. तर आज दि. 19 ऑक्टोबर रोजी राज्यात वादळी वारे आणि विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.

मागील 24 तासात झालेली तापमानाची नोंद पुढीलप्रमाणे:

अहिल्यानगर 31.2, कोल्हापूर 29.2, पुणे 39.9, जळगाव 33.4, नाशिक 31.2, महाबळेश्वर 24.3, सांगली 31.1, निफाड 30.5, सोलापूर 32.4, सातारा 30.2, डहाणू 32.0, सांगली 31.1, सांताक्रूझ 32.7, परभणी 33.4, रत्नागिरी 30.7, बीड 31.1, छत्रपती संभाजीनगर 32.2, अकोला 35.5, धाराशिव 31.1, चंद्रपूर 35.4, बुलडाणा 30.2, गडचिरोली 33.2, नागपूर 34.1, वाशीम 34.2, यवतमाळ 33, वर्धा 34.5, ब्रह्मपुरी 37.3.

कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संके

पूर्व मध्य अरबी समुद्रात उत्तर लक्षद्वीप बेटाजवळ चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून ही प्रणाली पश्चिमेकडे सरकताना आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रणाली पासून दक्षिण आंध्र प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर अंदमान समुद्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता असून या वाऱ्यांच्या प्रभावामुळे मंगळवार पर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

Weather News | पश्चिम महाराष्ट्र व कोकण पट्ट्यात सर्वाधिक पावसाची नोंद

आज या भागांना पावसाचा इशारा

कोकणपट्ट्यातील पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, धुळे, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.