Rain Alert | मॉन्सून देशातून परतला असून सुद्धा राज्यामध्ये वादळी पावसाचा जोर कायम आहे. आज दि. 17 ऑक्टोबर रोजी कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भासह उर्वरित राज्यात हलक्या स्वरूपाच्या पावसासह उन्हाचा चटका कमी-अधिक प्रमाणात असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.
Rain News | परतीच्या पावसाची राज्यात पुन्हा हजेरी; हवामान विभागाचा शेतकऱ्यांना इशारा
मॉन्सूनोत्तर पावसामुळे तापमानात घट
राज्यात सुरू असलेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे कमाल तापमानात घट झाले आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोल्यात उच्चांकी 36.5° तापमानाची नोंद झाली. तर ब्रह्मपुरी येथे 36.2 त्याचबरोबर अमरावती चंद्रपूर येथे 35 अशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर उर्वरित राज्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ-उतार असण्याची शक्यता आहे.
आज पावसासाठी पोषक हवामान
आज राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा असून पालघर, रायगड, ठाणे, मुंबई, नगर, पुणे, रत्नागिरी, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा कायम आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कमी दाबाचे क्षेत्र आज धडकणार
तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र किनाऱ्याकडे सरकत असून बुधवारी दि. 16 ऑक्टोबर रोजी ही प्रणाली चेन्नईपासून 320 किलोमीटर, पद्दुचेरी पासून 350 किलोमीटर पूर्वेकडे तर नेल्लोरपासून 400 किलोमीटर अग्नेयेकडे होती. तर आज दि. 17 ऑक्टोबर रोजी हे कमी दाबाचे क्षेत्र पद्दुचेरी आणि नेल्लोर जवळच्या किनाऱ्याला धडकून जमिनीवर येण्याची शक्यता आहे.
Rain News | परतीच्या पावसाची राज्यात पुन्हा हजेरी; हवामान विभागाचा शेतकऱ्यांना इशारा
आज ‘या’ भागांना आहे पावसाचा इशारा:
आज दि. 17 ऑक्टोबर रोजी सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सांगली, पुणे, नगर, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर या भागांना विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Rain Alert)