Weather News | राज्यभरात परतीच्या पावसाने लावलेल्या जोरदार हजेरी नंतर आता पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला असून आज उत्तर कोकण, मध्य व उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यात कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली आहे.
Weather Update | मॉन्सूनचा उत्तर भारतातून काढता पाय; दोन दिवसांत उर्वरित भागांतून मॉन्सून परतणार
आज या भागात पावसाचा इशारा
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमान 36 अंशाच्या पार गेले होते. तर परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर मात्र तापमानात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले असून रविवार दि. 13 ऑक्टोबर सकाळपर्यंत 24 तासांमध्ये परभणी येथे राज्यातील उच्चांकी 33.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर आज पावसाला पोषक हवामान असल्याने कोकणातील ठाणे, पालघर, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात ढगाळ हवामान आणि विजांसह पावसाचा अंदाज आहे.
मॉन्सूनचा प्रवास रखडला असून महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेल्या नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागातून माघार घेतल्यानंतर तब्बल आठवडाभरापासून महाराष्ट्रातील पावसाची वाटचाल थांबली आहे. शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी उत्तर भारतातून मॉन्सूनने माघार घेतली. त्यानंतर परतीसाठी पोषक हवामान असल्याने दोन दिवसांमध्ये मॉन्सून माघार घेण्याचा अंदाज आहे.
Weather News | आज राज्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची अंदाज; येलो अलर्ट कायम
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असून आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. तसेच बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांमुळे नैऋत्य बंगालच्या उपसागरात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्रफळ श्रीलंकेपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. (Weather News)