Agro News | खानदेशात केळीचे दर गडगडले


Agro News | गेल्या 18 ते 20 दिवसांमध्ये खानदेशात केळीदरात 1,200 ते 1,300 रुपयांनी घट झाली आहे. तर सध्या कमाल दर 2,150 प्रतिक्विंटल पर्यंत मिळत असून किमान दर 1,450 ते 1,900 रुपये प्रतिक्विंटल आहेत. केळीचा दर्जा आणि गुणवत्ता लक्षात घेत कळीला दर दिले जात असतात. अतल्प सध्या शेतकऱ्यांना 2,150 रुपये दर मिळत असून मागील 7 ते 8 दिवसात खानदेशात केळी आवकेत कुठलीही वाढ झालेली नसून दरात घट झाली आहे.

Agro News | सोयाबीन आणि तुरीच्या दरांमध्ये घसरण

मध्यप्रदेशात केळीला कमाल दोन हजार रु.प्रतिक्विंटल दर

मध्यप्रदेशमधील बऱ्हाणपूर येथील बाजारात केळीला लिलावात कमाल 2 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत दर मिळत असून तेथे केळीची आवक घटली आहे. दर्जेदार केळी फारशी लिलावात येत नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

Agro News | परतीच्या पावसामुळे ज्वारीची पेरणी लांबणीवर

येत्या आठवड्यात आवकेत घट होणार

तेथील बाजारात 2 ते 10 टन क्षमतेच्या वाहनांमधून केळी येत असतात. त्यामुळे सध्या प्रतिदिन सरासरी 30 ट्रक केळीची आवक होत आहे. परंतु दरात सतत घट होत आहे. त्यात खानदेशात बऱ्हाणपूरातील लिलावानुसार केळीची थेट किंवा शिवार खरेदी केली जाते. खानदेशात सध्या रोज 50 ते 55 ट्रक केळीची आवक होत आहे. या आवकेत पुढील आठवड्यात आणखीन घट होण्याची शक्यता आहे. (Agro News)