Onion News | आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाचे लिलाव बंद राहणार


Onion News | लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने आज सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी राज्यातील विविध बाजार समितीच्या मागण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यामुळे लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्यासह भुसार मालाचा लिलाव आज बंद राहणार आहे.

Onion News | दिवाळीपर्यंत कांदा शंभरी गाठणार; आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ

शेतीमालाचे लिलाव बंद

या संदर्भात सर्व शेतकरी व संबंधित मार्केट घटकांना सुचित करण्यात आले असून सोमवारी लासलगाव मुख्य बाजार, निफाड व विंचूर उपबाजार तसेच मानोरी खुर्द येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावरील कांदा भुसार व तेलबिया शेतीमालाचे लिलाव बंद राहणार आहे.

Onion News | श्रीरामपूर मार्केटमध्ये कांद्याची आवक घटली

शेतकऱ्यांना सोसावे लागणार आर्थिक नुकसान

अनेक शेतकरी उन्हाळ कांद्यापासून भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद इत्यादी भुसार बाजारात विक्रीकरिता घेऊन येत आहेत. मात्र बाजार समितीने पुकारलेल्या या संपाचा कांदा विक्रीवर व भुसार उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी आर्थिक नुकसानास सामोरे जावे लागणार आहे. तर आज लासलगाव मुख्य बाजार, निफाड व विंचूर उपबाजार मानोरी खुर्द येथील टोमॅटो भाजीपाला यांचा लिलाव सामान्यपणे सुरू राहणार आहे. (Onion News)