Agro News | गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार निर्देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि भारताला खाद्य तेलामध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठी 10,103 कोटी रुपयांच्या खर्चासह खाद्यतेल-तेलबियांच्या राष्ट्रीय मिशनला मंजुरी दिली आहे. 2024-25 ते 2030-31 या 7 वर्षांच्या कालावधीमध्ये 10,103 कोटी रुपयांच्या खर्चासह हे अभियान राबविण्यात येणार असून या मिशनद्वारे प्राथमिक तेलबिया उत्पादन 2022-23 मधील 39 दशलक्ष टनांवरून 2030-31 पर्यंत 69.7 दशलक्षणांपर्यंत वाढविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी 40 लाख अतिरिक्त हेक्टरनेट बियांची लागवड वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
Agro News | टोमॅटोच्या आवाकीत घट; व्यापारी मालाच्या प्रतीक्षेत
भारत वर्षभरामध्ये आपली वार्षिक खाद्य तेलाच्या गरजेच्या 60 टक्क्यांहून अधिक तेल आयात करत असतो. भारत इंडोनेशिया आणि मलेशिया येथून पामतेल आयात करतो. तर ब्राझील आणि अर्जेंटिना येथून सोयाबीन तेल आयात केले जाते, सूर्यफूल प्रामुख्याने रशिया आणि युक्रेनमधून येते. परंतु तेलबिया अभियानाच्या माध्यमातून भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, रेपसीड-मोहरी आणि तीळ यांसारख्या मुख्य प्राथमिक तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवण्यावर तसेच कापूस बियाणे तांदळाचा कोंडा आणि ट्री बोर्न ऑइल सारख्या दुय्यम स्त्रोतांपासून तेलाचे संकलन आणि तेल काढण्याची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.
Agro News | केळीचे दर 1600 रु. प्रतिक्विंटल वर स्थिर; विक्री दरात मात्र मोठी तफावत
शेतकऱ्यांच्या सेवेसाठी पोर्टल
‘जीनोम एडिटिंग’ सारख्या आत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च गुणवत्तेच्या बियाणांचा विकास करण्यात येणार असून दर्जेदार बियांची वेळेवर उपलब्धता ‘सीड ऑथेंटिकेशन, ट्रेसेबिलिटी अँड होलिस्टिक इन्व्हेंटरी(साथी)’ पोर्टलद्वारे हे अभियान ऑनलाइन 5 वर्षीय रोलिंग सीड योजना सादर करेल. ज्यामुळे राज्यांना सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था आणि सरकारी किंवा खाजगी बियाणे महामंडळाचा बियाणे उपलब्ध संस्थांशी आगाऊ करार करणे शक्य होणार आहे. तसेच बियाणे उत्पादनाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात 65 नवीन बियाणे केंद्रे आणि 50 बियाणे साठवण युनिटची स्थापना केली जाईल असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. (Agro News)