Agro News | सध्या टोमॅटोची आवक घटली असून नाशिकच्या पिंपळगाव बसवंत मार्केट यार्डमध्ये व्यापारी ट्रक भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. इतर वेळी काही तासात भरणारे ट्रक आता दोन-दोन दिवस उभे असल्याचे दिसू लागले असून व्यापारी माल मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर, पुढील काळात बाजार भाव टिकून राहणार असल्याची माहिती बाजार समिती यांच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
Agro News | केळीचे दर 1600 रु. प्रतिक्विंटल वर स्थिर; विक्री दरात मात्र मोठी तफावत
व्यापारी मालाच्या प्रतीक्षेत
नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड केली जाते. त्यातही टोमॅटो पिकाची सर्वाधिक लागवड असते. शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे अर्थकारण टोमॅटो पिकावर असते. जिल्ह्यामधील कांदा आगार असलेल्या पिंपळगाव, लासलगाव, चांदवड, येवला, पश्चिम पट्ट्यातील गिरणारे, सिन्नर परिसरात टोमॅटोची लागवड केली जाते. जिल्ह्यातील काही भागात टोमॅटोची काढणी सध्या सुरू झाली असून काही भागात झाडे फुल अवस्थेत आहेत. त्यात सप्टेंबरच्या शेवटची झालेल्या जोरदार पावसामुळे टोमॅटोचे मोठे नुकसान झाले. ज्यामुळे काढणीला आलेल्या पिकांवरही परिणाम झाल्याने आवक घटल्याचे चित्र आहे.
Agro News | पावसामुळे यंदा मिरज पूर्व भागात ऑक्टोबर महिन्यात द्राक्ष छाटण्या
टोमॅटोच्या आवाकीत घट
काही दिवसांपासून टोमॅटोची आवक घटली असून बाजार भाव समाधानकारक आहेत. पुढील काळात बाजार भाव टिकून राहणार असल्याची ही शक्यता आहे काल तीन ऑक्टोबर रोजी 39 हजार क्विंटल आवक झाली. तर प्रतिकॅरेटला सरासरी 1,100 रुपयांचा दर मिळाला असून बाजार भाव अहवालावर साधारण 15 सप्टेंबर पासून टोमॅटोची आवक घटली आहे. त्याच तारखेपासून बाजारभावातही तेजी येण्यास सुरुवात झाली आहे. (Agro News)
“आठवड्यापासून बाजारभावत 6 टक्क्यांनी वाढला असला तरी आवकेमध्ये 7.3 टक्क्यांची घट झाल्याचं बाजारात अहवालातून समोर आलं आहे.” -संजय लोंढे, पिंपळगाव बसवंत बाजार समिती सचिव