Deola | इटलीच्या शेती अभ्यासकांची देवळ्यातील शेतकऱ्याच्या डाळींब बागेला भेट


देवळा : तालुक्यातील अतिदुर्गम अशा कणकापूर येथे मंगळवारी (दि.२३) रोजी इटलीच्या शेती अभ्यासक कॅरोला यांनी जगदीश शिंदे यांच्या डाळींब बागेला भेट देऊन फळबाग लागवड शेतीची माहिती जाणून घेतली. अमेरिका विद्यापीठातर्फे आलेल्या या इटलीच्या शेती अभ्यासक शिष्टमंडळाने (दि.२३) रोजी महाराष्ट्रातील काही मोजक्या तीन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी केली. यात नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील अतिदुर्गम अशा कणकापूर येथील जगदीश नानासाहेब शिंदे यांच्या शेतात त्यांनी सकाळी पूर्ण तीन तास वेळ देवून ८० % ऑरगॅनिक + २०% केमिकलची सांगड घालत उत्कृष्ट डाळिंब शेती करून दाखवली. या उत्कृष्ट फळबाग लागवडीविषयी या परदेशी शिष्टमंडळाने समजून घेतले.

Deola | देवळा बाजार समितीत कांदा लिलावाचा शुभारंभ; उन्हाळी कांद्याला सर्वाधिक भाव

यावेळी टेकनोसर्व या कंपनीचे विकास घुमारे, अखिलेश कुमार (उत्तराखंड), हर्षदा सरगर (सोलापूर), अनिषा सलम (उडिसा), अविनाश निकम (मालेगाव) व देवळा पोमोग्रेनेट ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक योगेश गुंजाळ, सीईओ मयूर ठाकरे, गावातील शेतकरी प्रवीण शिंदे, अमोल जैन, विनोद शिंदे, मयूर गुंजाळ, काजल शिंदे, एकनाथ शिंदे, हिरामण बच्छाव, चेतन घुले, प्रदीप घुले हे उपस्थित होते.