Maharashtra Rain | पुढील आठवड्यात पावसाची स्थिती काय; उत्तर महाराष्ट्रात कसा असेल पाऊस..?


माणिकराव खुळे – हवामानशास्त्रज्ञ |  ९०० मीटर उंचीचा मान्सूनचा मुख्य आस सरासरी जागेवर असल्यामुळे उद्या रविवार (दि. १४) जुलै पासून पुढील चार दिवस म्हणजे बुधवार (दि. १७) जुलैपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची दाट शक्यता आहे. आस दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता असुन पावसासाठी अनुकूलता वाढेल. अरबी समुद्रातील ‘ऑफ शोर ट्रफ’ मजबूत आहे. पण त्याची ऊर्जा मुंबईसह कोकणात व सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील पावसासाठीच खर्ची होत आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात अजूनही धिम्या गतीने का होईना पण पाण्याच्या आवकेत सातत्य जाणवत आहे.

Maharashtra Rain | नाशिकमध्ये आठवडाभर पाऊस

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत १४ ते १७ जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, हा पाऊस खान्देश भागात व नाशिक जिल्ह्यात शनिवार (दि. २०) जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल.

Maharashtra Rain | नाशिक जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात एकदाच पाऊस; पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

पावसाचे आकडे दिसताय पण पाऊस नाही, असे का..?

परंतु, असे असले तरी मान्सूनच्या आगमनापासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होताच पुन्हा कमकुवत होतो आणि अशा पुन्हा पुन्हा ‘सक्रिय व कमकुवत’ च्या हेलकाव्यातून ‘कधी येथे तर कधी तेथे’ अश्या मर्यादित एक ते दोन किमीच्या परिसरात सायंकाळच्या दरम्यानच वीजा व गडगडाटासह एखाद्या दिवशी तीव्र पाऊस होताना दिसत आहे.

त्यामुळे पावसाच्या अपेक्षित समान वितरणाला धक्का पोहोचून पावसाळी दिवस कमी होत आहे. पावसाचे आकडे दिसतात पण शेतपिकांसाठी पाऊस नाही अशी ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे आणि हीच गेल्या महिनाभरातील महाराष्ट्रातील मान्सूनच्या पावसाची शोकांतिका आहे.

Maharashtra Rain | संपूर्ण राज्याला यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

इतर राज्यातील परिणामातून महाराष्ट्रातील पाऊस 

सध्या आसाम पुर्वोत्तरकडील ७ राज्यात व पूर्वेकडील यू.पी, बिहार, झारखंड या राज्यात कमी होणारा पावसाचा जोर तर दक्षिणेकडील (केरळ, कर्नाटक, तमिळनाडू) राज्यात वाढणारा अधिक पावसाचा जोर अशा एकमेकांशी निगडित वातावरणीय प्रणाल्या व तेथील पावसाची तीव्रता पाहता, महाराष्ट्रात विदर्भात व सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर अशा एकूण १६ जिल्ह्यात आजपासून पुढील ५ दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वरविण्यात आली आहे.