Vijay Wadettiwar | पक्ष चोरण्यात दंग असलेल्या महायुती सरकारला सामान्य शेतकऱ्यांचा विसर पडला असून, या दलालांकडून बळीराजाची लूट सुरूच आहे. मात्र, तरीही राज्य सरकार गप्प असल्याची बोचरी टीका कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केली. सोयाबीन पीकासह इतर पिकांची राज्य सरकारने हमी भावाने खरेदी करावी. तसेच सोयाबीनची खरेदी केंद्रे सुरु करावी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी मुख्यत्र्यांकडे केली आहे.
सोयाबीनची खरेदी ही अंतरराष्ट्रीय बाजार पेठेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तरीही किमान केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केली जाऊ नये. मात्र, व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी ही हमीभावापेक्षाही खालच्या दराने सुरू आहे. परंतु या पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या राज्य सरकारला सामान्य शेतकऱ्यांचा विसर पडला असून, शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन सोयाबीनची खरेदी केंद्रे सुरु करावी. तसेच सरकारने सोयाबीनची हमी भावाने खरेदी करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.(Vijay Wadettiwar)
Ram Temple | महाराष्ट्राच्या 7 हजार रंगीबेरंगी रोपांनी अयोध्येत तयार झाली ‘नक्षत्र वाटिका’
Vijay Wadettiwar | काय म्हणाले विजय वडेट्टीवार..?
तसेच यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, ” सोयाबीन हे किमान खर्चात येणारे पीक आहे. पण मागील अनेक वर्षांपासून रोगांचा प्रादुर्भाव, आस्मानी संकटं, वाढलेली मजुरी, बियाणे आणि औषधांचे वाढलेले दर यामुळे सोयाबीन पिकवणे आता शेतकऱ्यांना परवडणारे नाही. आणि जर त्यातच आता किमान आधारभूत किंमतीपेक्षाही कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात असल्याने सोयाबीन उत्पादक हवालदील झाले आहेत. आधीच केंद्र सरकारने सोयाबीनचा हमीभाव हा अत्यंत कमी ठरविला असून, व्यापाऱ्यांकडूनही सोयाबीनची खरेदी ही हमीभावापेक्षा कमी दरांनी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नही. पण तरीही यावर सरकार गप्प आहे.
Onion Export | …नाहीतर गांजा लागवडीची परवानगी द्या; संतप्त शेतकऱ्यांची मागणी
केंद्र शासनाकडून २०२२ ते २०२३ याकाळात सोयाबीनचा हमीभाव हा प्रती क्विंटल ४ हजार ३०० रुपये ठरविण्यात आलेला होता. तर, आता २०२३-२०२४ मध्ये ४ हजार ६०० रुपये इतका ठरविण्यात आला आहे. सोयाबीन पीकाचा उत्पादन खर्च पाहता हा हमीभाव अत्यंत कमी आहे. त्यातच आता सर्वच व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी ही केंद्राच्या हमीभावापेक्षाही अत्यंत कमी दरात करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत अनेक दिवसांपासून सोयाबीनला ३ हजार ८०० रुपये, तर नागपूर बाजार समितीत ४ हजार १०० रुपये प्रती क्विटंल असा निच्चांकी दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने, शेतकऱ्यांमध्ये सरकारबद्दल प्रचंड चीड निर्माण झालेली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या या सरकारला आता शेतकरीच धडा शिकवेल, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारव जोरदार हल्ला चढविला. (Vijay Wadettiwar)