Onion News | सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील तीन दिवसात तब्बल 1,164 ट्रक कांदा आवक झाला असून जुन्या कांद्याची आवक कमी होऊन नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवार दि. 24 ऑक्टोबर रोजी बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल 2,300 ते 5,600 रुपये असा भाव मिळत असून नवीन कांद्याला 2,500 ते 5,000 असा दर मिळत होता.
Onion News | फार्मर प्रोड्युसिंग कंपनी मार्फत खरेदी केलेला कांदा दिल्लीकरीता रवाना
कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता
यावर्षी सोलापूर जिल्ह्यात 30 हजार हेक्टर वर कांदा लागवड झाली असून अचानक होत असलेल्या पावसाने अनेकांचा कांदा जागेवरच खराब झाला असल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागणीच्या प्रमाणात बाजारात कांदा कमी असल्याने समाधानकारक भाव मिळत आहे. बांगलादेशातही कांद्याची मागणी वाढली असून आगामी काळात दरात अधिक सुधारणा होण्याची शक्यता आहे.
Onion News | सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण
तीन दिवसात 1164 गाड्या कांदा आवक
सोलापूर बाजार समितीत अजून देखील कांद्याचे आवक कमी असून मागील 3 दिवसात 1,164 गाड्या कांदा आला आहे. ही आवक यंदाच्या वर्षातील उच्चांकी आवक असून, जुन्या कांद्यापेक्षा आता नवीन कांदा अधिक असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे. (Onion News)