Grapes Rate | पुणे मार्केट यार्डात हंगामपूर्व द्राक्षांची आवक सुरू; काय मिळाला दर?…वाचा सविस्तर


Grapes Rate | द्राक्ष हंगाम सुरू होण्यास वेळ असला तरी पुणेकरांना यंदा आंबट-गोड द्राक्षांची चव हंगामा पूर्वीच चाखता येणार आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात हंगामपूर्वक द्राक्षांच्या आवकेस सुरूवात झाली असून घाऊक बाजारात 9 किलोच्या कॅरेटला 200 ते 1000 रुपये दर मिळत आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेक वाडी मार्केट यार्डात आज फळबाजारात दररोज दीड ते दोन टन द्राक्षांची आवक होत असून पुणे जिल्ह्यात सातारा व बारामती जिल्ह्यातील, फलटण भागातून द्राक्षे दाखल होत आहेत.

Agro News | वाढत्या महागाईत चोरट्यांचा लसणावर डल्ला; पंचवटी बाजारातून साडेतीन लाखांचा माल चोरीला

9 किलोच्या कॅरेटला 900 ते 1000 रुपये दर

घाऊक बाजारात द्राक्षाच्या 9 किलोच्या कॅरेटला 900 ते 1000 रुपये दर मिळत असून 5 किलोच्या निवडक मालाला 600 ते 800 रुपये भाव मिळत आहे. साधारणतः 15 डिसेंबर ते एप्रिल अअखेपर्यंत द्राक्षांचा हंगाम असतो. मात्र हल्ली काही शेतकरी आगाप माल बाजारात आणत असतात. याच आगाप मालाची बाजारात आवक सुरू झाली असून सध्या बाजारात दाखल झालेल्या मालाची लोणावळा, महाबळेश्वर या पर्यटन क्षेत्रातील विक्रेते व गुजरात, अहमदाबाद येथील व्यापाऱ्यांनी खरेदी करण्यास सुरुवात करण्यास सुरुवात केली आहे.

Agro News | व्यापाऱ्याने पैसे रखडवले; संतप्त शेतकऱ्यांचे लासलगाव बाजार समिती बाहेर आंदोलन

हंगामाच्या सुरुवातीलाच 20% जास्त भाव

तसेच पोषक वातावरणामुळे द्राक्षांचा दर्जा यंदा चांगला असून पीकही चांगले आले आहे. हळूहळू आवक वाढत जाणार असून सुरुवातीलाच गेल्या वर्षापेक्षा 20 टक्के जास्त भाव मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यसह परराज्यातील बाजारपेठेतूनही यंदा द्राक्षाला मागणी राहणार आहे. (Grape Rate)