Agro News | दिवाळी आणि पूर्ण झालेल्या काढणीमुळे सोयाबीनची बाजारात आवक वाढली असली तरी शेतकऱ्यांची मात्र बाजारभावामुळे निराशा होत आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षा 500 ते 700 रुपयांनी कमी भाव मिळत असून दुसरीकडे हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही खरेदीने वेग घेतलेला नाही. बारदानाचा तुटवडा आणि रखडत चाललेली प्रक्रिया यामुळे अपेक्षेप्रमाणे खरेदी होताना दिसत नाहीये.
Agro News | दिवाळ सणामुळे बाजार समित्या बंद; सोयाबिन विक्रीसाठी शेतकरी प्रतिक्षेत
आवक वाढल्यामुळे भावावर दबाव
त्यात बाजारात सोयाबीनची आवक वाढल्याने भावावर आणखीन दबाव पडला आहे. सध्या गुणवत्ता पूर्ण सोयाबीन 4,200 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान विकला जात असून, ओलावा असलेल्या सोयाबीनला केवळ 3,800 रुपयांपासून भाव मिळत आहेत. हा भाव हमीभावापेक्षा फारच कमी असून केंद्राने यंदा सोयाबीनसाठी 4,892 रुपये हमीभाव जाहीर केला. पण गुणवत्ता पूर्ण सोयाबीनचा भाव, हमीभावापेक्षा किमान 500 ते 700 रुपये आणि कमी असून ओलावा जास्त असलेल्या मालाला भाव 700 ते 1,100 रुपयांनी कमी आहे.
तर देशात यंदा सोयाबीनची लागवड वाढली असून पावसाने सोयाबीनला मोठा फटका बसला. नुकसान जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगल्या भावाची अपेक्षा होती. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी व देशातील बाजारातील घडामोडी यामुळे सोयाबीनचा बाजार दबावात आहेत. सोयाबीनचा भाव दबावत असल्याने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हमीभावाने 13 लाख टन सोयाबीन खरेदीला परवानगी दिली. त्याकरता जवळपास 500 खरेदी केंद्रांना खरेदीची परवानगी मिळाल्याचे ही पणन विभागाने स्पष्ट केले. ज्यापैकी जवळपास 400 केंद्रांवर खरेदी सुरू झाली होती. परंतु ही खरेदी केंद्रे नेमकी कोणत्या ठिकाणी आहेत, आपला माल कधी खरेदी होईल? याची माहिती शेतकऱ्यांना नाही.
शेतकऱ्यांमध्ये नाराजी
तर खरेदी केंद्रांवर सर्वकाही अलबेला सुरू असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. सरकारने केवळ निवडणुका डोळ्यापुढे ठेवून खरेदीला परवानगी दिली असून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठीच हमीभाव खरेदीचा डाव खेळला जात असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना या हमीभाव खरेदीचा अजूनही फायदा होत असताना दिसत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
Agro News | राहता बाजार समितीत कांद्याला काय मिळाला भाव? वाचा सविस्तर
सरकारकडून मोठ्या प्रमाणात हमीभाव खरेदीची आवश्यकता
यंदा सोयाबीन मंदीत असून सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करणे आवश्यक आहे. सरकारने मोठ्या प्रमाणात हमीभावाने सोयाबीनची खरेदी केल्यास खुल्या बाजारात सोयाबीनचे भाव सुधारण्यास मदत होईल. नाहीतर शेतकऱ्यांवर कमी भावाने सोयाबीन विकण्याची वेळ येऊ शकते. सरकारने हमीभावाने खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे.