Agro News | पावसामुळे सांगलीत उसाचा गाळप हंगाम लांबणीवर


Agro News | सांगली जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे खरिपातील पिकांना फटका बसला आहे. रब्बी हंगामातील पेरण्या खोळंबल्या असून या पावसाचा परिणाम यावर्षीच्या काळात हंगामाला बसणार आहे. परिणामी या पावसामुळे यंदाच्या गाळप हंगामखला बसणार असून परिणामी या पावसामुळे गाळप हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उस परिषदेत काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी गाळप हंगामाची जोरदार पूर्वतयारी केली आहे.

Agro News | नाशकात चोरट्यांची कांदा खळ्यावर डल्ला; 14 ते 15 गोणी कांदा चोरीला, सीसीटिव्ही देखील तोडले

किमान दीड महिन्यानंतर शेतात वाफसा

साखर कारखान्यांना बॉयलर अग्नीप्रदीपन केले असून 15 नोव्हेंबर पासून कारखाने सुरू करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी कारखान्यांना दिले आहेत. तर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरुवात असून या पावसामुळे शेतात पाणी साचून दलदल झाली आहे. पाणंद रस्त्यांची अवस्था ही अतिशय बिकट असल्यामुळे पावसाने ऊस तोडणीसाठी परिस्थिती नसल्याचे कारखान्यांकडून सांगितले जात आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी किमान दीड महिन्यानंतर शेतात वाफसा येईल अशी स्थिती आहे.

Agro News | खानदेशात कापसाची आवक कमी; दरात देखील घसरण

25 ऑक्टोबर च्या परीक्षा देत ऊस दराबाबत धोरण निश्चित होणार

25 ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होणार असून या परिषदेत ऊस दराबाबत धोरण निश्चित केले जाणार असून त्यामुळे या परिषदेत काय निर्णय होणार आहे? तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय साखर कारखाने मान्य करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे ऊसतराच्या पहिल्या उचलीसाठी शेतकरी संघटनांचे आंदोलन होणार की हंगाम सुरू होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.