Agro News | यावर्षी पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण 12,133 हेक्टर वर नाचणीची लागवड करण्यात आली असून त्यापैकी, डहाणू तालुक्यात 100 हेक्टरच्या आसपास लागवड करण्यात आली आहे. नाचणीची लागवड कमी क्षेत्रावर होत असली तरी, शेतकऱ्यांना वर्षभर वापरासाठी उपयोगात येईल असा प्राथमिक विचार करत शेतकरी नाचणीची लागवड करत असतात.
Agro News | यंदा खरीप हंगामात सरासरी पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी
नाचणीची कणसे बहरली
तर आदिवासी भागात नाचणीला देव मानत असल्यामुळे परंपरा जपण्यासाठी थोडाफार प्रमाणात का होईना शेतकरी नाचणीच्या लागवडीकडे वळले आहेत. तर डहाणूत नाचणी पिकाची चांगली वाढ झाली असून पिकाला कणसे तयार होत असल्याची माहिती डहाणूचे कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी दिली.
Agro News | समाधानकारक पावसामुळे यंदा खानदेशात तुरीची लागवड वाढली
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना
दरम्यान, कारखाने वाढल्याने आणि निसर्गाच्या कोपामुळे दिवसेंदिवस नाचणीचे उत्पादन कमी होत चालले असून पूर्वी मूठभर पेरायचे तर खंडीभर पीक यायचे, आता मात्र गोणभर पेरले तरी कणभर पीक येत नाही, अशी अवस्था झाली आहे. असे शेतकरी सांगतात. उत्तम पौष्टिक मूल्य असल्यामुळे व लोकांमध्ये आहाराबाबत सहजगता वाढल्याने गरिबांचे अन्न असलेली नाचणी ग्लोबल झाली असून दिवसेंदिवस नाचणीची मागणी पाहता शेतकऱ्यांनी आर्थिक आणि शारीरिक बाजू बळकट करण्यासाठी नाचणीचे जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली आणावे. असा सल्ला यावेळी कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे. (Agro News)