Mallikarjun Kharge | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जनतेला दिलेली पंचसूत्री नक्की पूर्ण करणार असून आमच्या सर्व गॅरंटी पूर्ण करू तसेच आम्ही सोयाबीनला सात हजार रुपये दर देऊ. असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले आहे.
Soybean News | हमीभाव जाहीर करूनही सोयाबीन उत्पादक तोट्यात; कमी दरामुळे होतेय आर्थिक नुकसान
पंतप्रधानांच्या भाषणावरून साधला निशाणा
यावेळी बोलताना, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राज्याच्या निवडणुकीतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ फिरत आहेत. हे मी माझ्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत पाहिले नसून मोदी आणि शहा घरोघरी फिरून काँग्रेसला शिव्या घालत आहेत. मोदी फक्त गांधी फॅमिलीला शिव्या घालण्याचे काम करत असून ते शेती, शेतकरी, रोजगार, उद्योग यावर का बोलत नाहीत?” असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
Soybean Rate | बार्शी बाजार समितीत सोयाबीनचे दर गडगडले; दिवाळीनंतर दरात घसरण सुरूच
एकता, स्वातंत्र्यलढा व गरिबांसाठी भाजप कधी लढली नाही
तसेच, “लोकसभेत राहुल गांधी पंतप्रधान होतील म्हणून मोदी त्यांना शिव्या घालत होते. ते ठीक आहे. पण महाराष्ट्र आणि झारखंड मधील निवडणुकीचा व गांधी कुटुंबाला शिव्या घालण्याचा संबंध काय?” असा सवाल विचारत, “महाराष्ट्रात राहुल गांधी मुख्यमंत्री बनणार नाहीत, ना मोदी मुख्यमंत्री बनणार आहेत.” असा टोला देखील लगावला. तसेच, “काँग्रेस जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम परत लागू करणार अशी खोटी अफवा भाजपा पसरवत आहे. हे कोण असे म्हटले? ते दाखवा! तर मात्र भाजप सांगत नाही. देशाची एकता, स्वातंत्र्यलढा व गरिबांसाठी भाजप कधी लढली नाही.” असे देखील खरेगे यावेळी म्हणाले.