Agro News | दसऱ्याच्या खरेदीत साखरेला अपेक्षेपेक्षा कमी दर; दिवाळीत दर वाढण्याची शक्यता


Agro News | नुकताच दसरा पार पडला असून दिवाळीसाठीच्या साखर खरेदीसाठी येत्या काही दिवसांत सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर दसऱ्यापूर्वी काही दिवस अगोदर साखर कारखान्यांकडून साखरेची खरेदी झाली. या काळात साखरेला क्विंटलला 30 ते 40 रुपयांपर्यंत दरवाढ मिळाली. मात्र खरेदीला म्हणावा तसा वेग नसल्याने साखरेच्या दराची वाढ मर्यादित असल्याची माहिती आहे.

Agro News | तुर आणि हरभऱ्याच्या किमतीत घट तर कोरड्या हवामानामुळे यावर्षी आवक लवकर सुरू

त्यामुळे आता दसरा झाल्यानंतर दिवाळीसाठी साखरेची खरेदी सुरू होण्याची शक्यता असून सध्या व्यापाऱ्यांकडून साखरेच्या दराबाबत नोंदणी कारखान्यांकडे करणे सुरू झाल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले आहे. तसेच सध्या साखरेचे दर 3600 ते 3700 रुपये प्रतिक्विंटल इतके असून, दुसऱ्यापूर्वी असलेल्या दरांच्या तुलनेत फक्त 30 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे. परंतु या वाढीत देखील सातत्य नसल्याचे कारखान्यांतील सुत्रांनी सांगितले आहे.

यंदा साखरेला चांगला दर मिळणार

तर येत्या 8 दिवसांमध्ये दिवाळीच्या काळातील साखरेची खरेदी वेगात होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली असून केंद्राने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचा कोटा मर्यादित दिल्याने मोठ्या प्रमाणात बाजारात साखर विक्रीस येण्याचा अंदाज आहे. यामुळे यंदा साखरेला दर चांगला मिळेल असा कारखान्यांचा अंदाज आहे. दिवाळी सणामुळे साखरेची मागणी वाढणार असल्याने ऑक्टोबरच्या उत्तरार्धामध्येच ऑक्टोबरसाठी कारखान्यांना दिलेला साखरेचा कोटा पूर्ण होऊ शकतो, असे सूत्राने सांगितले असून वर्षभर महाराष्ट्रातील कारखान्यांना बहुतांश राज्यातूनच मागणी असते. त्यामुळे दिवाळीच्या काळात मात्र अनेकदा राज्यात बाहेरून साखरेला मागणी येते, तेव्हा दिवाळीच्या काळात इतर कालावधी पेक्षा साखरेच्या दरात वाढ असते.

केंद्राकडून अजूनही एमएसपीत कधी वाढ होईल याबाबत निश्चित खात्री दिली गेली नसल्याने, दिवाळीच्या कालखंडात एमएसपी वाढल्याने साखरेचे दर किरकोळ बाजारातही वाढतील या शक्यतेमुळे एमएसपी वाढीचा निर्णय हा दिवाळीनंतरच होऊ शकतो. असे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळीसाठी साखर खरेदी ही सध्याच्या दरानेच व्यापाऱ्यांना करावी लागणार आहे. तातडीने एमएसपी वाढीची शक्यता नसल्याने आम्ही नियमित प्रमाणातच साखर खरेदी करत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले आहे.

Agro News | आसमानी संकटामुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम; शेतकरी चिंतेत

मुबलक साखर साठा

तर मागच्या वर्षीचा मुबलक साखर साठा शिल्लक असल्याने, यावर्षी बाजारात साखरेची टंचाई भासणार नसून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचाही या कालावधीसाठी कोटा वाढविण्याबाबत हालचाली सध्या तरी नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. (Agro News)