Agro News | अमरावतीत संत्र्याच्या भावावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यामध्ये वाद


Agro News | अमरावतीत संत्र्याच्या भावावरून शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये वाद झाला असून परिणामी शेतकऱ्यांना आप-आपला माल संबंधित कंपनीमधून परत न्यावा लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या कंपनी विरोधात नाराजी व्यक्त करत आपली फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला जातोय.

Agro News | नाशिकमध्ये आधारभूत खरेदी-विक्री केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

भाव कमी मिळाल्याने शेतकरी संताप्त

गेल्या दोन वर्षांपासून वरुड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत्र्याच्या खरेदीसाठी एक कंपनी स्थापन करण्यात आली आहे या कंपनीमार्फतच शेतकऱ्यांची संत्रे हर्रास पद्धतीने विकली जातात अशा तर शुक्रवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी बाजार समितीच्या परिसरात संत्र्याचा बाजारभाव 28 रुपये किलो प्रमाणे ठरवण्यात आला होता त्यानंतर काही काळाने ऐवजी 16 रुपये भाव मिळाला. त्यामुळे एकाच दिवशी दोन भाव कसे? असा प्रश्न जेव्हा शेतकऱ्यांनी विचारला असता कंपनीच्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत वाद घातल्यामुळे काही वेळ बाजार समितीचे वातावरण तापले होते.

Agro News | खाद्यतेल-तेलबियांच्या राष्ट्रीय मिशनला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीच दखल न घेतल्यामुळे त्यांनी तिथून माल परत नेला. ज्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच योग्य भाव मिळवून देण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेत, योग्य तो भाव द्यावा. अशी मागणी आता शेतकरी नितीन पेलागडे यांनी केली आहे. (Agro News)

“संत्री पाहून त्यांचे भाव ठरवण्यात येतात. तेव्हा चांगल्या संत्र्यास चांगला भाव येतो. थोडा खराब असल्यास त्याला कमी भाव मिळतो. असे सूत्र या कंपनीचे असते. त्यामुळे यामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव नाही. बाजार समिती शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे. – बबलू पावडे, सभापती, बाजार समिती