Aadhaar-PAN | आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक न केल्यास आता मालमत्तेवर एक टक्क्यांऐवजी 20 टक्के टीडीएस भरावा लागणार आहे. यासंदर्भात आयकर विभागाने मालमत्ता खरेदीदारांना नोटिसा पाठवलेल्या आहेत. नवीन नियमांनुसार, 50 लाख किंवा त्याहून अधिक किंमतीच्या कोणत्याही मालमत्तेच्या खरेदीदाराला केंद्र सरकारला 1 टक्के टीडीएस आणि विक्रेत्याला एकूण किमतीच्या 99 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. (Aadhaar-PAN)
Flipkart Big Year-End Sale उद्यापासून होणार सुरु; आयफोन-TV वर तुफान ऑफर्स
आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर आयकर विभागाने 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता खरेदी करणाऱ्या खरेदीदारांना नोटीस पाठवली असून या नोटीसमध्ये संबंधित लोकांना मालमत्ता खरेदीवर 20 टक्के टीडीएस भरण्यास सांगण्यात आलेले आहे.
आयकर विभागाला अशी अनेक प्रकरणे आढळून आली असून जिथे मालमत्ता विक्रेत्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नाहीत. बहुतेक प्रकरणांमध्ये मालमत्ता विक्रेत्याचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे ते निष्क्रिय होते आणि अशा परिस्थितीत, ज्या खरेदीदारांचे पॅन कार्ड निष्क्रिय आहे आणि त्यांनी 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेच्या खरेदी केलेली आहे, अशा लोकांना टीडीएस भरण्याच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत.
Winter Diseases | हिवाळ्यात फुफ्फुस खराब होण्याचा धोका जास्त; काय आहेत नेमकी कारणं?
आयकर कायद्याच्या कलम 139 AA अंतर्गत, आयटीआरमध्ये आधार लिंक करणे आवश्यक असणार आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 होती. या तारखेपर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड विनामूल्य लिंक केले जात होते मात्र आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणाऱ्या व्यक्तीकडून 1000 दंड आकारला जातो आहे.