Breaking News | नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा बेमुदत कांदा लिलाव बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चांदवड येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. जोपर्यंत कांदा निर्यातीसंदर्भात तोडगा निघत नाही तोपर्यंत कांदा लिलाव बंद असेल असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातलेली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत ही बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गात नाराजीचे सूर उमटताना दिसत आहे. मनमाड आणि लासलगाव बाजासामिती मध्ये कांदा लिलाव बंद करण्यात आलेला आहे. या कांदा निर्यात बंदीमुळे आज अचानक कांदा export बंद झाल्याच चित्र दिसून येत आहे.
Agriculture News | चक्रीवादळ निवळल्यानंतरही राज्यात ढगाळ हवामान; कशी घ्याल रब्बी पिकांची काळजी?
मिनिमम एक्सपोर्ट प्राईस जी 800 डॉलर होती त्याची मुदत 31 डिसेंबर 2023 रोजी पर्यंत होती ती वाढवून 31 मार्च 2024 अशी करण्यात आली आहे. यामागे सरकारला भीती आहे की. कांद्याचे भाव खूप वाढले तर याचा फटका सर्वसामान्यांना बसेल. काल सायंकाळच्या सुमारास भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, वाणिज्य महासंचालनालयाचे विदेशी व्यापार वैनिज्य भवन, नवी दिल्ली मधून यासंदर्भातील पत्रक जाहीर करण्यात आले होते आता यावरच निषेध म्हणून नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारला मतांच राजकारण करायचं आहे
सरकारने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा कारण कांद्याला जरी मागे भाव होता तरी अवकाळी आणि गारपिटीमुळे आधीच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सरकारने हा निर्णय तत्काळ मागे घेतला नाही कांड उत्पादक संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करेल. सरकारला या मागे फक्त मतांचं राजकारण करायचं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे.- भरत दिघोळे (कांदा असोसिएशन)