Weather News | विदर्भात ‘ऑक्टोबर हिट’मुळे उन्हाचा कडाका वाढला


Weather News | राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढत असून ‘ऑक्टोबर हिट’मुळे विदर्भात उन्हाचा चटका वाढला आहे. मागील काही दिवस स्वातंत्र्याने कमाल तापमान 35 अंशाच्या पुढे गेले असून पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने आज दि. 8 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भात वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये उन्हाचा चटका कायम राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Weather Update | आज दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा इशारा; उर्वरित राज्यात उन्हाचा उकाडा कायम

अरबी समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र

मॉन्सूनने परतीच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात केल्यानंतर शनिवारी दि. 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या उत्तरेकडून नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागातून माघार घेतली. त्यानंतर मात्र मॉन्सूनची वाटचाल थबकली असून महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. केरळ आणि परिसरावरील चक्राकार वारे तसेच बंगालच्या उपसागरातून लक्षदीप बेटांपर्यंत चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे अरबी समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

राज्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला

पावसाने विश्रांती घेतलेल्या भागांमध्ये सध्या उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत असून सोमवार दि. 7 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत 24 तासांमध्ये अकोला येथे राज्यातील सर्वोच्च 36.8°c तापमानाची नोंद झाली आहे. तर ब्रह्मपुरी येथे 36.7° त्याचबरोबर जळगाव, सांताक्रुज, नागपूर, वर्धा येथे कमाल तापमान 35 च्या पार आहे. तर आज दि. 8 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये असलेल्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्गसह विदर्भामधील यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये मात्र उन्हाच्या झळा कायम राहणार असून तर काही ठिकाणी विजांअसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विधानाने वर्तविला आहे.

राज्यभरातील तापमानाची नोंद

सोमवारी सकाळपर्यंत 24 तासांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 32.7°c तर जळगाव 35.6, महाबळेश्वर 25.8, कोल्हापूर 31.9, नाशिक 31.3, मालेगाव 31.0, सांगली 31.8, सांताक्रुज 35.2, निफाड 31.7, तर सातारा 30.6, सोलापूर 34.0, रत्नागिरी 32.2, डहाणू 33.3, बीड 30.8, संभाजीनगर 32.4, अकोला 36.8, भंडारा 34.6, अमरावती 34.8, ब्रह्मपुरी 36.7, परभणी 34.0, गोंदिया 34.8, नागपूर 35.4, गडचिरोली 34.6, चंद्रपूर 34.6, वाशिम 36.6, वर्धा 35.0 तर यवतमाळ मध्ये 34.0 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

या भागात पावसाचा इशारा

आज सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Weather News | आज राज्यात ‘या’ भागात विजांसह पावसाचा अंदाज

सर्वाधिक तापमान ठरलेली ठिकाणे

तर ब्रह्मपुरी 36.7, अकोला 36.8, जळगाव 35.6, सांताक्रुज 35.2, वर्धा 35 तर नागपूर 35.4. (Weather News)