Rain News | नाशकात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी


Rain News | कालपासून नाशिक जिल्ह्यासह शहरात परतीच्या पावसाने तग धरला असून, यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास पावसाने त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, इगतपुरी या भागात हजेरी लावली होती. यानंतर आज दुपारच्या सुमारास पावसाने नाशिक शहरातील विविध भागांमध्ये हजेरी लावल्यामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडाली.

Rain News | राज्यात मान्सूनोत्तर पावसाचा धुमाकूळ; शेतीकामे रखडली

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

आज सकाळी नाशिक शहरात कडक ऊन पडले होते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. त्यानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास ढग दाटून आले व 4 वाजता पाऊस पडायला सुरूवात झाली. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबष उडाली. शहरातील सिडको, शालीमार, मेनरोड, सीबीएसएस आदी भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते.

Rain News | परतीच्या पावसाची राज्यात पुन्हा हजेरी; हवामान विभागाचा शेतकऱ्यांना इशारा

नुकसानग्रस्त भागात पंचनामे करणार – अजित पवार

दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्रंबकेश्वरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काल नाशिक जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसावर भाष्य करत, “सध्या परतीच्या पावसामुळे भात पिकांचे नुकसान होत असल्यामुळे आचारसंहिता असली तरी नैसर्गिक संकट असल्यामुळे वरिष्ठांना पंचनामे करण्याबाबत सांगितले जाईल.” असे सांगितले आहे. (Rain News)