Agro News | मागील आठवड्यापासून खानदेशात ढगाळ व पावसाळी वातावरण होते. पण बुधवार दि. 18 रोजी अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे उडीद, मूग कापूस यासारख्या पिकाची हानी वाढली आहे.गेल्या पाच ते सात दिवसांपासून बहुतांश ढगाळ वातावरण, वेगाने वाहणारे वारे अशी परिस्थिती होती. त्यात तापमान देखील 34 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत होते. बहुतेक शेतकऱ्यांची शेतकामांची लगबग सुरू होती. परंतु अशातच पाऊस आल्याने पीकहानी वाढली आहे. मध्यंतरी अनेक दिवस पाऊस होता. पण मागील दोन ते तीन दिवस सकाळी हलके ढगाळ वातावरण असायचे, त्यानंतर ऊन सावली अशी परिस्थिती असायची. त्यामुळे दुपारी शेतकामे गतीने सुरू होती. परंतु आता पाऊस सुरू झाल्याने खराब रस्त्यांच्या क्षेत्रात असलेल्या केळी उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात हवामान विभागाकडून पुढील काही दिवस सर्वसाधारण पाऊस असण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे.
Agro News | केळीच्या आवकीत घट; सणासुदीमुळे उठाव कायम
पावसामुळे शेतीच्या कामांमध्ये अडचणी
त्यामुळे आता कापूस, केळी, उडीद, मूग सोयाबीन उत्पादक शेतकरी धास्तावले असून खानदेशात केळी उत्पादक पक्व झालेल्या केळींची खराब वातावरणामुळे काढणी करून घेत आहेत. मध्यंतरी पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे केळी पक्व होण्याची प्रक्रिया गतीने सुरू होती. आता ऊन नसल्याने काढणी, मळणी, कापणी वाहतुकीच्या कामांमध्ये अडचणी येत आहेत. धुळे शिंदखेडा जळगाव, एरंडोल, धरणगाव भागात गेले दोन दिवस जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. जळगावातील यावल, रावेर, बोदवड भागात पाऊस नव्हता परंतु ढगाळ पावसाळी वातावरण सर्वत्रच आहे. त्यामुळे शेतकरी केळी पिकातील वाफसा देखील कायम राहावं अशी अपेक्षा करीत असून सिंचन बंद केले आहे. तर सिंचन करण्यासाठी मुबलक पाणीसाठा आहे.
Agro News | ‘सरकारने योजना भ्रष्टाचार करण्यासाठी काढल्यात का?’; बच्चू कडूंचा सरकारला संतप्त सवाल
पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
सतत पडणाऱ्या पावसामुळे कापूस, उडीद, मूग सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले असून उडीद, मुगाला अनेक भागात कोंबेही फुटली होती. उडीद, मूग मळणीची कार्यवाही होऊ शकत नव्हती. मळणी करण्याची गरज असतानाच पाऊस आला त्यामुळे यात नुकसान झाले आहे. आता पुन्हा पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढ झाली आहे. पावसाच्या उघडिपीणे कापूस वेचणीला ही गती आली होती. परंतु पावसाने पुन्हा सुरुवात केल्यामुळे आता वेचणी ही ठप्प होणार आहे. तर कापूस वेचून साठवणूक करण्याची कार्यवाही देखील अनेक भागांमध्ये थांबली आहे. कारण वेचणीसाठी हवेशीर वातावरण हवे असते, कापूस पिकाची हानी मागील हंगामात कमी पावसाने झाली. यावेळी मात्र अति पावसामुळे कापूस पिकाला फटका बसत आहे. (Agro News)