Agro News | यावर्षी देशात १० टक्क्यांनी कमी झालेली लागवड व पिकाचे नुकसान यामुळे कापूस उत्पादनात यंदा ७ टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. कापूस उत्पादन यंदा ३०२ लाख गाठींवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. तर निर्यात कमी होऊन आयात वाढू शकते असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे.
Agro News | परतीच्या पावसाने द्राक्षावर संक्रांत; छाटणी खोळंबली
२३ लाख गाठींची घट होण्याचा अंदाज
कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच सीएआयने २०२४-२५ च्या हंगामाचा पहिला अंदाज व्यक्त करत, मागच्या वर्षी देशातील कापूस उत्पादन ३२५ लाख गाठी होते. त्यात यंदा २३ लाख गाठींची घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदाच्या हंगामातील उत्पादन ३०२ लाख गाठींवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. तर सध्या चालू हंगामात मागील हंगामातील शिल्लक साठा ३० लाख गाठींवर असून गेल्यावर्षीच्या तुलनेत शिल्लक साठा काहीसा अधिक आहे. देशातील उत्पादन घटले असून वापर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आयात वाढणार आहे.
भारत आणखी २५ लाख गाठी कापूस आयात करण्याची शक्यता
नुकत्याच सरलेल्या हंगामात भारताने १७,५०,००० गाठी आयात केली होती. चालू हंगामात भारत आणखी २५ लाख गाठी कापूस आयात करण्याची शक्यता असून कापूस आयातीत यंदा ७.५ लाख गाठींची वाढ होण्याचा अंदाज आहे. तसेच यंदा देशातून कापूस निर्यात कमी राहण्याचा अंदाज असून नुकत्याच सरलेल्या हंगामात भारताने २८ लाख ५० हजार गाठी कापूस निर्यात केली होती. यंदा कापूस उत्पादनात घटीचा अंदाज असून, तर कापूस निर्यात १८ लाख गाठींवरच स्थिरावेल असा अंदाज सीआयएने व्यक्त केला आहे.
गुजरातमध्ये मोठी घट
उत्तर भारत व गुजरातमध्ये उत्पादनात घट जास्त असून गेल्या हंगामात गुजरातमध्ये ९० लाख ५० हजार गाठी उत्पादन झाले होते. यंदा उत्पादन ८० लाख गाठींवर फिरवण्याचा अंदाज आहे. म्हणजेच उत्पादनात १० लाख ५० हजार गाठींची घट होण्याची शक्यता आहे तर हरियाणा पंजाब राजस्थान मधील उत्पादनात ९ लाख ६२ हजार गाठींची घट होणार आहे महाराष्ट्रात देखील उत्पादन काहीसे कमी होण्याचा अंदाज असून आंध्र प्रदेश तेलंगणात ओडिषा तमिळनाडू मधील उत्पादनातही घट होईल असा सीआयए चा अंदाज आहे. (Agro News)