Agro News | सोयाबीन आणि तुरीच्या दरांमध्ये घसरण


Agro News | बाजारपेठांमध्ये सोयाबीनचा किमान दर 4000च्या आत पोचला असून मागील अनेक दिवस 10 हजारांवर विकत असलेल्या तुरीचे दरही घसरले आहेत. बाजार समित्यांमध्ये तुरीचा सरासरी दर 10 हजारांच्या आत उतरला असून काही ठिकाणी 9500 पर्यंत दर मिळतो आहे. सध्या नव्या हंगामाचा सोयाबीन बाजारात येत असून विविध बाजार समितीमध्ये आवकेत वाढ झाली आहे. सोयाबीनचा किमान दर 4 हजारांपेक्षा कमी असून कमाल दरही 4600 पर्यंत आहेत. तरी सर्वच मला हे दर मिळत नसून येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी 4400 पर्यंत दर मिळत आहे.

Agro News | परतीच्या पावसामुळे ज्वारीची पेरणी लांबणीवर

सोयाबीनसह तुरीचे दरही घसरले

तर हमीभाव पेक्षा हा दर कमी असून सोबतच बाजारात आता तुरीच्या दरातही घसरण झाली आहे. ज्यामुळे ही चिंतेची बाब ठरत आहे. येथील बाजार समितीत मंगळवारी तूर किमान 8 हजार 500 व कमाल 100 हजार 575 रुपयांनी विकली गेली तर सरासरी दर हा 9800 होता. आजवर तुरीचा सरासरी दर हा दहा हजारांवर होता. काही महिन्यांपूर्वी तुरीचा दर 11 हजारांपर्यंत पोहोचला होता व नंतर कमी कमी होत आता 9500 हजारापर्यंत येऊन ठेपला आहे. तर आठवड्याभरात तुरीच्या दारात साधारणता 500 ते 700 रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक घसरण झाल्याचे सांगितले जात असून गेल्या वर्षभर मिळालेले दर यंदाही टिकून राहतील चांगले दर मिळणार असल्याची शक्यता पाहत शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड वाढवली आहे. तर सर्वच जिल्ह्यात तुरीची लागवड यंदा समाधानकारक आहे.

Agro News | सीताफळासाठी यंदाचा हंगाम समाधानकारक

आतापर्यंत झालेली पेरणी

तर राज्यामध्ये तुरीची 12 लाख 23 हजार हेक्टर वर पेरणी झाली असून अकोला जिल्ह्यामध्ये यंदा सरासरी 55 हजार 508 हेक्टरच्या तुलनेत, 62 हजार 76, बुलढाण्यात 79 हजार २०८ हेक्टरच्या तुलनेत, 88 हजार 803 तर वाशिम जिल्ह्यामध्ये 58 हजार 610 हेक्टरचा तुलनेत, 66 हजार 436 हेक्टर वर तुरीची लागवड झाली आहे. या तीन्ही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक हेक्टरवर पेरणी झालेली असून आता तुरीचा हंगाम दीड-दोन महिन्यांवर येऊन ठेपलाय. तेव्हा सध्या बाजारात मागील हंगामातील तूर येत असून नवीन तूर बाजारात दाखल झाल्यानंतर हा दर किती राहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Agro News)