Weather Update | पावसाने घेतली विश्रांती; राज्यात आज पावसाच्या तुरळक सरी


Weather Update | मागील दोन-तीन दिवसांपासून मराठवाडा विदर्भात पावसाने एकच धुमाकूळ घातला होता. नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. आज मात्र पावसाचा जोर ओसरला असून राज्यातील काही ठिकाणी तुरळक सरी बरसण्याची शक्यता आहे. यवतमाळ मधील नरखेड महागाव येथे मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र मागील दोन-तीन दिवस सलग झालेल्या पावसानं शेत शिवारांमध्ये पाणीच पाणी झाल्याचे चित्र असून पिकांचे नुकसान झाले आहे.

Weather Update | राज्यात पुढील 72 तासात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका?

कोकणामध्ये कमी अधिक स्वरूपाचा पाऊस पडत असून ठाणे रायगड रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पावसाचा हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या होत्या. तलसरी पालघर येथे 86 मिलिमीटर, तर झरी 72, तलवड 25 मिलिमीटर तर ठाण्यातील शहापूर, किनहवळी, डोळखाम येथे 37 मिलिमीटर, रायगडातील पवयंजे येथे 31 मिलिमीटर आणि रत्नागिरीतील लांजा मध्ये 31 मिलिमीटर पाऊस पडला. तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर अधिक होता. वैभववाडी येथे 80 मिलिमीटर तर येडगाव 71, बावडा येथे 67 मिलिमीटर पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी सरी बरसल्या

पुणे नाशिक कोल्हापूर या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. नाशिक, नांदगाव येथे 78 मिलिमीटर, धुळे थाळनेर येथे 48 मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील कारला, लोणावळा येथे 33 मिलिमीटर तर कोल्हापुरातील गगनबावडा येथे 67 आणि मिलीमीटर चंदगडमध्ये 53 मिलिमीटर पाऊस झाला.खानदेश मधील नंदुरबार मौलगी, वडफळी येथे 61 मिलिमीटर तर चिंचपाडामध्ये 53, मंदाणा 37, नवागाव 38, असलोद 36, तोरणमाळ 58 मिलिमीटर, जळगावातील कुऱ्हा, तोंडापूर येथे 48 मिलिमीटर तर छत्रपती संभाजीनगर पिशोर चिंचोली येथे 78 मिलीमीटर त्याचबरोबर कन्नड, चापनेरमध्ये 43 चिकलठाण्यात 40 मिलिमीटर पाऊस झाला. नांदेडयेथे पावसाचा जोर अधिक असल्यामुळे अर्धापूर येथे सर्वाधिक 94 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील अमरावती यवतमाळ नागपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मध्यम पाऊस झाला.

Weather News | यंदा बैल पोळ्याला राज्यभर दमदार पाऊस; पंजाबराव डखांनी वर्तवला हवामान अंदाज

पूर्व महाराष्ट्रात कमी प्रमाणात पाऊस

त्यामानाने वाशिम, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी प्रमाणात होता. अमरावती मधील रामतीर्थ येथे 86 मिलिमीटर तर सामदा 65, यवतमाळमधील मालखेड येथे 95 मिलिमीटर तर नागपूरमधील आडेगाव येथे 45 मिलिमीटर पाऊस पडला. वाशिममध्ये 60, वारळा 43 तर भंडाऱ्यातील बेला येथे 40, वर्ध्यातील झाडसी येथे 34 मिलिमीटर तर खांढळी येथे 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गोंदियातील किशोरी, घोटनगाव येथे 56 मिलिमीटर पाऊस पडला. (Weather Update)