Weather News | मागील काही दिवसांपासून पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे तापमानात वाढ झाली होती. परंतु आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने राज्याच्या विविध भागात वादळीवाऱ्यांचा हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Weather Update | अखेर मॉन्सून परतीच्या प्रवासाला लागणार
सोमवारी दिनांक 23 रोजी मॉन्सूनची परतीची वाटचाल सुरू होण्याचे संकेत असून पश्चिम राजस्थान आणि कच्चे मधून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्यास पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, गुना, मंडला, राजनंदगाव, गोपालपुर ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. तर पूर्व मध्य बंगालचा उपसागर ते थायलंडच्या उत्तर भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात उद्यापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.
पावसाच्या विश्रांतीने तापमानात वाढ
पावसाने केलेल्या उघडिपीमुळे कमाल तापमानाचा पारा वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबर हिटच्या झळा बसत आहेत. शनिवारी सकाळपर्यंत 24 तासांमध्ये नागपूर येथे राज्यातील उच्चांकी 35.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा यवतमाळ, सोलापूर येथे तापमान 35 अंशावर पोहोचले होते. आज राज्यात पावसाचा जोर वाटण्याची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये वादळीवाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तर राज्यातील इतर भागात पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे.
Weather News | मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदाही लांबणीवर
वादळीवाऱ्यांसह पावसाचा इशारा
सोलापूर पुणे बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली वर्धा अमरावती भंडारा नागपूर या भागात पावसाचा येलो अलर्ट असून नगर सांगली छत्रपती संभाजी नगर जालना भागात विधानसभा पावसाची शक्यता आहे. (Weather News)