PM Kisan Yojana | गावपातळीवर होणार ई-केवायसी विशेष मोहिम


PM Kisan Yojana | अल्प किंवा अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यास सुरुवात झालेली आहे. या योजने अंतर्गत दोन हेक्टर पर्यंत शेती असलेल्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते. या योजनेचा १६ वा हप्त्याचा लाभ येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन असून या योजनेसाठी नोंदणी करणे, ई- केवायसी करणे, बँक खाती हीआधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे.

महाराष्ट्र राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoR नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न आणि E-KYC न केलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेच्या लाभासाठी समावेश करण्यास अजूनही वाव असल्याने केंद्र शासनाने दिनांक ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत गावपातळीवर ४५ दिवसांची विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने डॉ. प्रवीण गेडाम (आयुक्त कृषी) यांनी महसूल, ग्रामविकास तसेच कृषी या विभागांनी सर्व समन्वयाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना PM Kisan Yojana यामध्ये समाविष्ट करण्यासाठी या विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी आणि eKYC साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आलेले आहे.

PM Kisan योजनेच्या १६ वा हप्त्याचा लाभ येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरीत करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन असून या योजनेसाठी नोंदणी करणे, E-KYC करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.