Onion Rate | केंद्र शासनाकडून कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मात्र कांद्याच्या दरात क्विंटल मागे जवळपास 500 रुपयांची दरवाढ झाली. अनेक बाजार समित्यांमध्ये क्विंटलला 5000 पर्यंत दर मिळत आहे. परंतु सध्या शेतकऱ्यांकडे कांदाच कमी असल्याने याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतोय याबाबत शंकाच आहे. याउलट या शासन निर्णयाचा फायदा साठेबाजीवाल्यांनाच होत असल्याचे चित्र आहे.
Onion News | नगरमध्ये प्रतिक्विंटल कांद्यावर 300 ते 400 रुपयांची दरवाढ
महाराष्ट्रामध्ये कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. गेल्या वर्षी कांदा निर्यात बंदी आणि अतिरिक्त निर्यात शुल्क लादल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल दराने कांदा विकावा लागला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती आणि याचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला बसला. अक्षरशः कांदा पट्ट्यातील उमेदवारांना प्रचार करणे अवघड झाले होते.
Onion News | नाशकात उन्हाळ कांद्याला विक्रमीदर; शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा अशी परीस्थिती निर्माण होऊ नये. यासाठी केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात दर कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता कुठे कांद्याला समाधानकारक दर मिळत आहे. कांद्याच्या दरात क्विंटलमागे 400 ते 500 रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र, असे असले तरी कांदा पट्ट्यातील शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक नसल्याची वस्तूस्थिती आहे. त्यामुळे केंद्र शासनानाच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होत आहे यावर प्रश्नचिन्हच आहे.
“केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात शुल्क कमी केल्यामुळे दरात वाढ आहे. पण याचा फायदा शेतकऱ्यांना होतच नाही आहे. कारण पावसाळ्यात कांदाच निघत नाही. त्यात निवडणुका असल्याने निर्णय झाला असून याचा फायदा कांदा साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांना होतोय. त्यामुळे केंद्राच्या धोरणामध्ये शेतकऱ्यांना कुठेच स्थान नाही.”- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना