Nashik Rain | नाशिक : महाराष्ट्रात काही दिवसांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. यानुसार, कालपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, धरणांच्या पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर, गंगापूर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरी दूधडी भरून वाहत आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून, यामुळे दिंडोरी तालुक्यातील वाघाड, तिसगाव, पालखेड ही धरणे ‘ओव्हरफ्लो’ होण्याची शक्यता आहे.
दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी
गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केले असून, येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले असून, गोदा काठावरील मंदिरांमध्येही पाणी शिरले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातही पाणी शिरल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. गंगापूर धरण 80 टक्के भरले असून, यामुळे धरणातून 8 हजार 100 क्यूसेक्स वेगाने पाणी सोडले जात असल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. (Nashik Rain)
पाऊस असाच सुरू राहिल्यास पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, काल रामकुंड येथे एक तरुण अभियंत्याचा तोल गेल्याने तो वाहून गेल्याचीही घटना घडली. त्यामुळे भाविकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या बतीने करण्यात आले आहे.
Nashik Rain | नाशिकमधील ‘ही’ धरणं ओवरफ्लो; जिल्ह्यातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा..?
Nashik Rain | कळवण तालुक्यातील धनोली धरण ‘ओव्हरफ्लो’
गेल्या दोन दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस सुरू असून, या पावसाने कळवण तालुक्यालाही झोडपले आहे. या पावसामुळे धनोली धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरण भरल्याने सांडव्यामार्गे विसर्ग सुरू असल्याने नदीला पूर आला असून, नदीकाठच्या धनोली ते शेपूपाडा परिसरातील 40 ते 50 शेतकऱ्यांच्या भात व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Nashik Rain)
बागलाणमधील केळझर धरण ‘ओव्हरफ्लो’
दरम्यान, बागलाणमधील ‘केळझर’ धरणही पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून आरम नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. केळझर मध्यम लघू प्रकल्प परिसरात संततधार सुरू असल्याने धरण भरले असल्याने आरम खोऱ्यातील शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास याची मोठी मदत होणार आहे.
Nashik Rain | दिंडोरी तालुक्याला अवकाळीने झोडपलं; अजूनही लोकप्रतिनिधी गप्प!
नाशिक जिल्ह्याला यलो अर्लट
आणखी काही दिवस उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने नाशिक जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने संपूर्ण नाशिक जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ दिला असून, नाशिकसह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.