Nashik | ‘ई-नाम’ मुळे शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता येणार..!



सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांचा अधिक फायदा होणार असून व्यवहारातील पारदर्शकता वाढणार असल्याचे प्रतिपादन भारत सरकार कृषी किसान विकास मंत्रालयाचे रंगनाथ कटरे यांनी शनिवारी (दि.१७) रोजी देवळा बाजार समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती योगेश आहेर हे होते.

Nashik Rain | देवळा तालुक्यात जोरदार पाऊस; गिरणा नदीला पुर, दोन गावांचा संपर्क तुटला

केंद्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ई-नाम (राष्ट्रीय कृषी बाजार) योजनेबाबत संबंधितांना माहिती मिळण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रणाली अंतर्गत देवळा बाजार समितीचा समावेश झाला असून, याबाबतचे मार्गदर्शन केंद्र शासन नियुक्त मार्गदर्शक रंगनाथ कटरे यांनी केले. याप्रसंगी उपसभापती अभिमन पवार, संचालक भाऊसाहेब पगार, दिलीप पाटील, शिवाजी पवार, अभिजित निकम, शाहू शिरसाठ, भास्कर माळी, शीतल गुंजाळ, भावराव नवले, अशोक आहेर, सचिन सूर्यवंशी, सचिन आहेर, सचिव माणिक निकम, उपसचिव मयूर आहेर, साहोक चव्हाण, सुनील विश्वास, पुंडलिक माळी, संजय जाधव, गोविंद बच्छाव, अर्चना वाघमारे आदींसह शेतकरी, व्यापारी, मापारी, शेतकरी वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.

Nashik Rain | नाशकात पावसाची जोर’धार’; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’

याप्रसंगी कटरे यांनी शेतमालास योग्य भाव मिळणे, शेतमालाचे वर्गीकरण (ग्रेडिंग), योग्य हाताळणी, मालाचे योग्य वजन व विक्री झालेल्या मालाचे या योजनेंतर्गत राज्यातील इतर बाजार समितीमध्ये नोंद असणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांना बोली लावणे शक्य होणार आहे. त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन चांगला दर मिळवता येणार आहे. भविष्यात शेतमालास गावांतील राष्ट्रीय स्तरावरदेखील बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असून शेतकऱ्यांना देय असणाऱ्या रक्कम बाबत अधिक सुरक्षितता निर्माण होणार आहे, असे सांगितले.