Maharashtra Rain | या महिन्यात पावसाने राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा दिला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा विसावा घेतला असून, पावसाचा जोर ओसरल्याचं दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाला असून, धरणांच्या पाणीसाठ्यात झाल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवमान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार राज्यात 15 ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच आतापर्यंत सरासरीपेक्षा 29 टक्के अधिक पाऊसही झाला आहे. (Maharashtra Rain)
Nashik Rain | देवळा तालुक्यात जोरदार पाऊस; गिरणा नदीला पुर, दोन गावांचा संपर्क तुटला
Maharashtra Rain | आजचा हवमान अंदाज
या महिन्याच्या शेवटीही पावसाची हजेरी लागणार असून, सध्या जरी पावसाचा जोर ओसरला असला तरी उद्या 15 ऑगस्टपासून 22 ऑगस्टपर्यंत हळूहळू राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. तर, ही वाढ महिना अखेरपर्यंत चालू राहील. यंदा पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून, सरासरीपेक्षा आतापर्यंत 29 टक्के जास्त पाऊस झाला आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार काही भागात ढगाळ वातावरण असेल पण राज्यात आज कुठेही पावसाची शक्यता नाही. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश धरणे आता भरत आली असून दारणा, भावली, नांदूर मध्यमेश्वर, या धरणं ओवरफ्लो झाली आहेत. तर, गंगापूरसह इतर धारणांच्या पाणीसाठयातही समाधानकारक वाढ झाली आहे. (Maharashtra Rain)
Nashik Rain | नाशकात पावसाची जोर’धार’; दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’