Maharashtra Rain Update | नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभाकडून ‘अलर्ट’ जारी


Maharashtra Rain Update |  गेल्या काही दिवसांपासून राज्यात विसावा घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. राज्यातील काही भागात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झाला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसत असल्याने पुरपरीस्थिती निर्माण झाली आहे. पुणे आणि नाशकातही पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, आजही हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना अलर्ट दिला असून, राज्यभरात विजांच्या कडकडाटासह पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे.(Rain Update) बघूयात आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस बरसण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागात पुढील मंगळवारपर्यंत वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, मराठवाड्याच्या काही भागांतही मध्यम स्वरूपाचा पावसाचा (Rain Update) जोर असेल. दरम्यान, हवामान विभागाकडून राज्याच्या काही भागांत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.(Maharashtra Rain Update)  

Rain Update | राज्यात मुसळधार पाऊस, उत्तर महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट

Maharashtra Rain Update | ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

 दरम्यान, आज हवामान विभाकडून पुणे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,  गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. 

राज्यातील धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे, जळगाव आणि सांगली या जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, आज या भागांमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पुढील दोन ते तीन दिवस ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. 

North Maharashtra | उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कधी..?