Dindori | नाशिक मधील दिंडोरी तालुक्यात महावितरण कंपनीकडून केल्या जाणाऱ्या दररोजच्या भारनियमनाने शेतकरी आणि उद्योजक संताप व्यक्त करत आहेत. रोज सकाळी संध्याकाळी भारनियमन होत असून महावितरणाने या भारनियमनावर अजून पर्यंत तोडगा न काढल्याने शेतकरी बांधवांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Dindori Lok Sabha | कांदा उत्पादकांना भारती पवारांची गॅरंटी; ‘मी निवडणून आल्यास हक्काने…’
ग्रामीण भागाला भारनियमानाने फटका
सध्या तालुक्याच्या ग्रामीण भागात तर संध्याकाळचे अत्यावश्यक भारनियमन केले जात असल्यामुळे तालुक्यात वाड्या वस्तींवर राहणाऱ्या जनतेला अंधारात राहावे लागते आहे. त्यात तालुक्यात सर्वच ठिकाणी बिबट्यांची संख्या अधिक प्रमाणात झाल्यामुळे अंधाराचा फायदा घेते बिबटे वस्ती-वाड्यांमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे शेतमजुरांसह शेतकरी वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
द्राक्षाच्या छाटणीला आलेल्या मजुरां देखील भारनियमनामुळे त्रास
सध्या तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यात भाजीपाला पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या पिकांना पाण्याची आवश्यकता असते. पण दररोजच्या भारनियमनाने शेतकऱ्यांना शेतात पाणीपुरवठा करणे अवघड झाले आहे. त्यात तालुक्यात द्राक्षबागाच्या छाटणीला सुरुवात झाली असून पेठ, सुरगाणा तालुक्यातून छाटणीसाठी आलेल्या मजुरांनाही अंधाराचा सामना करावा लागत असून बिबट्यांपासून धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व वाडी-वस्त्यांवरील लोकांनी बिबट्याच्या भीतीने महावितरण कंपनीकडून रीतसर वीज कनेक्शन घेतले असून सुद्धा सतत होणारे भारनियमनामुळे ग्राहक वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला असून आता तर दिवसातही इमर्जन्सी भारनियमनाच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे सध्या सर्व स्थरातून वीज पुरवठ्यासंदर्भात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत आहेत.
Agro News | सोयातेलासाठी सोयाबीनच्या गाळपित वाढ; भावदरांवर परीणाम होणार?
भारनियमनातून सुटका करण्याची शेतकऱ्यांची मागणी
या भारनियमनाने शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून तालुक्यातील सर्व वाडी वस्त्यांवरील लोकांनी बिबट्याच्या भिताने महावितरण कंपनीकडून रीतसर वीज कनेक्शन घेतलेले आहे. तरीही, सतत होणारे रात्रीचे भारनियनामुळे ग्राहक वर्गामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यात आता दिवसाही इमर्जन्सी भारनियमाच्या नावाखाली विजपुरवठा खंडीत केला जात आहे. या भारनियमनाने शेतकरी वर्ग त्रस्त असून महाराष्ट्राच्या वीज मंत्र्यासह कृषी मंत्र्यांनी या भारनियमनातून त्वरित सुटका करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. (Dindori)