सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यात रविवारी दि. १३ रोजी सायंकाळी पश्चिम भागातील कोलती नदीच्या उगमस्थानाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने कोलती नदीच्या पुरात रात्री हनुमंतपाडा येथील एक जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. तर येथील, खर्डे नव्याने बांधण्यात आलेला फरची पूल देखील वाहून गेल्याने या ठिकाणी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याची माहिती प्रशासनाला कळविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
Deola | अवकाळी पावसाने देवळ्यात शेती पिकांचे आतोनात नुकसान; शेतकरी हवालदिल
दुचाकी स्वार वाहून गेल्याची माहिती
तालुक्यात गेल्या तीन चार दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, काल रविवारी दि. १३ रोजी खर्डे परिसरात हनुमंतपाडा येथे सायंकाळी विजांच्या कडकडासह कधी नव्हे इतका परतीचा पाऊस झाल्याने कोलथी नदीला पूर आला. या पूर पाण्यात हनुमंत पाडा येथील एक युवा शेतकरी रात्री आपल्या दुचाकीने घरी परत जात असताना वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती नागरिकांनी तलाठ्यांना दिली असून, सदर इसमाचा नदीकाठच्या भागात स्थानिक नागरिकांनी शोध मोहीम सुरू केल्याचे समजते. (Deola)