Agro News | नाशकात ‘कृषीथॉन प्रदर्शन’ 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार


Agro News | शेतकरी वर्गाला अध्याय व तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी आणि कृषी मालाची गुणवत्ता सुधारण्यासाठी 1998 मध्ये सुरू झालेल्या ‘कृषीथॉन’ प्रदर्शनाची 17 वी आवृत्ती यावर्षी दि. 21 ते 25 नोव्हेंबर दरम्यान नाशिक येथे ठक्कर डोम, एबीबी सर्कलजवळ आयोजित करण्यात येणार आहे. ‘कृषीथॉन’ हे कृषी, उद्योजक, शास्त्रज्ञ, शेतकरी आणि जाणकारांच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक सर्वोत्तम व्यासपीठ ठरले असल्याची माहिती संजय न्याहारकर यांनी दिली.

Agro News | सांगली जिल्ह्यात मका, ज्वारीच्या पेरणीला सुरुवात

प्रदर्शनात शासनाच्या विविध योजनांचा

या प्रदर्शनात शेतीची यंत्रे आणि उपकरणे, अचूक कृषी तंत्रज्ञान, पीक संरक्षण आणि पोषण, कृषी रसायने आणि खते, शाश्वत शेती पद्धती, सिंचन आणि जल व्यवस्थापन प्रणाली, बियाणांच्या जाती आणि अनुवंशिकी, वर्टीकल शेतीचे तंत्र, मातीचे आरोग्य आणि संवर्धन, कृषी क्षेत्रातील ड्रोन ॲप्लीकेशन, स्मार्ट सिंचन उपाय असे विविध स्टॉल असणार असून त्याचबरोबर जनजागृतीसाठी शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचाही याच समावेश केला गेला आहे.

कृषी तज्ञांकडून मार्गदर्शन

या 5 दिवसीय कृषीथॉन प्रदर्शनामध्ये 300 हून अधिक कृषी पूरक संस्थांचा समावेश करण्यात आला असून पिकविषयक चर्चासत्रांमध्ये नामांकित शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतील. ‘कृषीथॉन युवा सन्मान’च्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांचा सन्मान होणार आहे. तसेच यंदा भारत सरकारच्या लघु व सूक्ष्म मंत्रालयाद्वारे कृषीथॉनमध्ये सहभागी लघु उद्योजकांना स्टॉल भाड्यावर सबसिडी देखील मिळणार आहे. त्यामुळे उत्पादन प्रदर्शित करण्यासाठी ही उत्तम संधी आहे.

Agro News | अमरावतीत संत्र्याच्या भावावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यामध्ये वाद

अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन

कृषीथॉन प्रदर्शनाची संपूर्ण माहिती www.krishithon.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर अधिक माहिती करिता ९८२२८४२२६५ या क्रमांक वर संपर्क साधण्याचे आवाहन साहिल न्याहारकर यांनी केले आहे.(Agro News)