Agro News | मध्य प्रदेशातील बाजारात केळीच्या आवकित मोठी वाढ झाली आहे. परीणामी खानदेश शिवार किंवा थेट खरेदीत केळी दरात गेल्या 12 ते 15 दिवसात एक क्विंटल मागे 1,100 ते 1000 रुपयांची घट झाली आहे. मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूरात केळीची आवक सतत वाढत आहे. तर बऱ्हाणपूर बाजारात लिलावामध्ये जे दर केळीला मिळत आहेत त्याच दरात खानदेशात केळीची शिवार किंवा थेट खरेदी केली जाते. मागील शनिवारपर्यंत तेथील आवक 227 (16 टन क्षमतेचा एक ट्रक) ट्रकांपर्यंत पोहोचली होती. ही आवक मागील पंधरवड्यात 110 ते 120 ट्रक प्रतिदिन अशी होती. खानदेशात केळी आवकेत फारशी वाढ झालेली नाही. परंतु नजीकच्या राज्यातील बाजारात केळीची आवक वाढल्याने त्याचा परिणाम खानदेशात केळीदारांवर सतत होताना दिसतोय.
Agro News | पावसामुळे खंड पडल्यानंतर आता नवरात्रीमध्ये द्राक्ष काढणी जोर धरणार
केळीच्या दरात घसरण
खानदेशात 15 ते 16 दिवसांपूर्वी दर्जेदार किंवा निर्यातक्षम केळीचा दर कमाल 3,361 रुपये प्रतिक्विंटल होता. परंतु सध्या निर्यातक्षम केळीचा दर 2300 ते 2400 रुपये प्रतिक्विंटल असा आहे. तर कमी दर्जाच्या केळीचा दर 1,500 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल असा आहे. गणेशोत्सव काळात राज्यात केळीच्या दराला उठाव होता. त्यामुळे नवी मुंबई, ठाणे, कल्याण आदी भागात केळीची पाठवणूक बऱ्याचपैकी होत होती. खानदेशात सध्या रोज 70 ते 80 ट्रक केळीची आवक होत असून अनेक भागांमध्ये कांदेबाग केळीची काढणी 70 ते 80 टक्के पूर्ण झाली आहे.
Agro News | श्रीगोंदा बाजार समिती म्हैसूर आणि गाझियाबादमध्ये विक्रीकेंद्र उभारणार
दर आणखी घसरण्याची शक्यता
पुढील आठवड्यात आवक कमी होईल अशी स्थिती आहे. दर्जेदार केळी जळगावातील चोपडा, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, यावल आदी भागात आहेत. तर रावेर, मुक्ताईनगरमध्ये केळीची आवक फारशी नसून पुढे खानदेशात केळीची आवक आणखी कमी होईल असा अंदाज वर्तवला जातोय. (Agro News)